Ahmednagar Politics : निलेश लंकेंमुळे अजित दादांना धक्का, काही राजकीय गणितेही बदलली

Ahmednagarlive24 office
Published:
lanke pawar

Ahmednagar Politics : मागील वेळी विधानसभेला निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत निवडून आले व आमदार झाले. मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडली आणि ते अजित पवार यांच्या गटात गेले. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा शरद पवार गटात आले आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

दरम्यान तो राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला असल्याने आता पारनेरची एक जागा रिक्त झाली आहे. पण आता त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांची संख्या एकाने घटली आहे. तसेच निलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडणे हा दादांसाठी एक धक्का असल्याची चर्चा नागरिक करत होते.

दरम्यान कालावधी कमी राहिले असल्याने पोट निवडणूक होण्याची शक्यता देखील नसल्याने आगामी विधानसभेची निवडणूक होऊपर्यंत ही जागा रिक्त राहील असे म्हटले जात आहे.

विधानसभेला पारनेरची राजकीय समीकरणे बदलणार?
दरम्यान आता निलेश लंके यांच्या लोकसभेच्या निवडणूक लढवल्याने आता पारनेर मधील राजकीय समीकरणे बदलतील अशी चर्चा होऊ लागली आहे. त्याचे कारण असे की या लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण आगामी विधानसभेला उमेदवार कोण राहील? अजित पवार गटाने या जागेवर दावा केला तर येथे कोणता उमेदवार महायुतीकडून राहील याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

तसेच पारनेरच्या राजकारणावर निलेश लंके यांचे देखील वर्चस्व असल्याने ते तेथे काय भूमिका घेतील यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. त्याचप्रमाणे अजितदादा पारनेर येथील प्रचार सभेत म्हणाले होते की, पारनेरला आता आमदार नसला तरी राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री आहेत व त्या नात्याने ते पारनेर मध्ये लक्ष घालतील.

आता लोकसभा निवडणुकीत लंके-विखे यांचे झालेले टोकाचे राजकारण जर पाहिले तर विखे पाटील पारनेर तालुक्यात अधिक लक्ष घालतील व राजकीय समीकरणे बदलावतील अशी देखील चर्चा नागरिक करत आहेत. आता येत्या ४ जूनला लोकसभेचा निकाल काय लागतो यावर बरीचशी राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe