Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. ज्या तुम्हाला उत्तम व्याजासह खात्रीशीर परतावा आणि जोखीममुक्त गुंतवणुकीची सुविधा देतात. ही सरकारी योजना असल्याने येथील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
देशात पोस्ट ऑफिस योजनेची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अशातच तुम्हीही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे, येथे गुंतवणुकीच्या नियमांमध्ये काही बदल झाले आहेत. सध्या नवीन नियम लागू झाले आहेत जे तुमच्यासाठी जाणून घेणे महत्वाचे आहे.
तुमच्या माहितीसाठी 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्डची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय गुंतवणुकीच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. आता पोस्ट ऑफिस आयकर विभागाकडे पॅन कार्डची माहिती क्रॉस चेक करेल.
डदरम्यान, पीपीएफ, एनएससी आणि इतर लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील पॅन, आधार अनिवार्य झाले आहेत. 7 मे 2024 रोजी जारी केलेल्या पोस्ट विभागाच्या अधिसूचनेनुसार पॅन पडताळणीशी संबंधित प्रणाली 1 मे 2024 पासून बदलण्यात आली आहे.
जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल. किंवा ज्या लोकांचा पॅन आणि आधार कार्ड डेटा जुळत नाही ते पोस्ट ऑफिसच्या या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाहीत.
डेटा न जुळल्यामुळे या लोकांना केवळ पोस्ट ऑफिसमध्येच नाही तर इतर सरकारी योजनांमध्येही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. डेटा जुळत नसल्यामुळे पॅन आधार लिंकिंग केले जाऊ शकत नाही. त्यामुळे पॅनकार्ड रद्द करण्यात येऊ शकते. अशास्थितीत गुंतवणूकदारांनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.