Mahindra SUV Price Hike : तुम्हीही येत्या काही दिवसात एसयूव्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीने आपल्या काही कारच्या किमती अपडेट केल्या आहेत. महिंद्रा या लोकप्रिय ऑटो कंपनीने आपल्या काही मॉडेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.
यामुळे ग्राहकांना महिंद्रा कंपनीची गाडी खरेदी करण्यासाठी आता अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. महिंद्रा कंपनीने आपल्या लोकप्रिय थार या SUV च्या किमतीत देखील मोठी वाढ केली आहे. खरेतर Thar ही SUV कार भारतीय ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
ही लोकप्रिय गाडी कंपनीची एक टॉप सेलिंग कार आहे. दरम्यान कंपनीने आता या लोकप्रिय कारच्या किमतीत वाढ केली असल्याने आता ग्राहकांना ही कार खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
दरम्यान आता आपण महिंद्रा कंपनीने या लोकप्रिय गाडीच्या किमतीत कितीने वाढ केली आहे, तसेच या गाडीच्या अपडेटेड किमती कशा आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कितीने महाग झाली महिंद्रा थार
महिंद्रा ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या गाडीची क्रेज संपूर्ण भारतात पाहायला मिळते. ग्रामीण भाग असो की शहरी भागात तुम्हाला ही गाडी सहजतेने नजरेस पडणार आहे.
विशेषता तरुणांमध्ये ही गाडी अधिक लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते. आता मात्र कंपनीची ही लोकप्रिय एसयुव्ही गाडी महाग झाली आहे. कंपनीने थारच्या किमतीत वाढ केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीने थार एसयूव्हीची किंमत 10,000 रुपयांनी वाढवली आहे. पण, ही दरवाढ सर्वच व्हेरियंटवर नाहीये. कंपनीने फक्त काही निवडक व्हेरियंटवरच दरवाढ लागू केली आहे.
बेस-स्पेक LX हार्ड-टॉप पेट्रोल AT RWD, AX(O) हार्ड-टॉप डिझेल MT RWD आणि LX हार्ड-टॉप डिझेल MT RWD या 2 व्हेरिएंटच्या किमती कंपनीने वाढवलेल्या आहेत. इतर व्हेरिएंटच्या किमती मात्र अजूनही जशा आधी होत्या तशाच आहेत.
महिंद्रा थारच्या अपडेटेड किमती कशा आहेत?
महिंद्रा कंपनीने महिंद्रा थारच्या AX(O) हार्ड-टॉप डिझेल MT RWD आणि Earth Edition डिझेल AT 4WD या व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या आहेत. आता AX(O) हार्ड-टॉप डिझेल MT RWD या व्हेरियंटची किंमत 11.35 लाख एवढी झाली आहे.
तसेच Earth Edition डिझेल AT 4WD या मॉडेलची किंमत 17.60 लाख रुपयांवर पोहचली आहे. पण, या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.