Mahindra Thar Price Hike : महिंद्र थार ‘इतक्या’ रुपयांनी महागली, ग्राहकांच्या खिशावर पडणार अधिक भार…

Published on -

Mahindra Thar Price Hike : जर तुम्ही महिंद्रा थार विकत घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला ही SUV महाग पडणार आहे. कपंनीने नुकतीच या SUV ची किंमत वाढवली आहे. कपंनीने वाढवलेल्या किमतीमुळे आता तुम्हाला ही SUV किती रुपयांनी महाग पडणार आहे जाणून घेऊया…

महिंद्रा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय SUV थारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. वाढत्या खर्चामुळे कपंनीने ही वाढ केली आहे. कंपनीने जारी केलेल्या नवीन किंमतीनुसार महिंद्रा थारच्या निवडक प्रकारांच्या किमती 10,000 रुपयांनी वाढणार आहेत.

महिंद्रा मोटर्सने ज्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत त्यामध्ये LX हार्ड-टॉप डिझेल MT RWD प्रकार, बेस-स्पेक LX हार्ड-टॉप पेट्रोल AT RWD, AX(O) सारख्या प्रकारांची नावे आहेत या निवडक प्रकारांव्यतिरिक्त, महिंद्राच्या इतर ट्रिम्सच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

वैशिष्ट्ये

महिंद्र थार 3-डोअर असलेल्या SUV कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, ते फीचर्समुळे नेहमीच चर्चेत असते, यामध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात एलईडी डीआरएल, एलईडी टेललाइट आणि हॅलोजन हेडलॅम्प आहेत. या वाहनाला फॅब्रिक अपहोल्स्ट्री, पावर स्टीयरिंग व्हील आणि मागील विंडो डिफॉगर आणि फ्रंट पॉवर विंडो देखील मिळतात.

पॉवर इंजिन

Mahindra Thar SUV मध्ये समाविष्ट असलेल्या पॉवर इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 150bhp/320Nm क्षमतेचे 2.0-लीटर, टर्बो पेट्रोल इंजिन आणि 130bhp/300Nm क्षमतेचे दुसरे 2.2-लिटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे. ट्रान्समिशनसाठी 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत.

किंमत

LX पेट्रोल AT RWD, AX(O) डिझेल MT RWD आणि LX डिझेल MT RWD प्रकारांच्या थारच्या किंमती 11.35 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि 17.60 लाख रुपयांपर्यंत जातात. महिंद्राने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये थारच्या किमती वाढवल्या होत्या त्याच धर्तीवर यंदाही वाढ करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe