Swift CNG Model Price And Mileage : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार उत्पादित करणारी आणि सर्वाधिक कार सेल करणारी कंपनी आहे. या कंपनीचा ग्राहक वर्ग खूप मोठा आहे. कंपनीचे अनेक मॉडेल ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी स्विफ्ट ही देखील कंपनीची अशीच एक लोकप्रिय गाडी आहे. ही हॅचबॅक कार ग्राहकांच्या पसंतीस खरी उत्तरली आहे. या गाडीची क्रेज संपूर्ण देशभर पाहायला मिळते.
ग्रामीण भाग असो की शहरी भाग ही गाडी तुम्हाला सर्वत्र नजरेस पडणार आहे. या गाडीची किंमत आणि किमतीच्या तुलनेत मिळणारे फीचर्स तथा दमदार मायलेज या गाडीला इतर हॅचबॅक कार पेक्षा वेगळी बनवते. ही गाडी मध्यमवर्गीयांमध्ये देखील लोकप्रिय आहे.
दरम्यान कंपनीने या गाडीची लोकप्रियता पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकी स्विफ्टचे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने या नव्याने लॉन्च झालेल्या गाडीत इंजिन बदलले आहे. या गाडीला झेड सीरीजचे नवीन इंजिन देण्यात आले आहे. यामुळे या नवीन जनरेशन मॉडेलचे मायलेज सुधारले आहे.
आधीच्या मॉडेलच्या तुलनेत हे नवीन जनरेशन मॉडेल अधिक मायलेज देत असल्याने ही गाडी ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय होणार असा विश्वास कंपनीला आहे. मात्र असे असले तरी, कंपनीने या कारचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च केलेले नाही.
दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये गेल्या काही दिवसांपासून कंपनी लवकरच या मॉडेलचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करणार असल्याचा दावा केला जात आहे. कंपनी येत्या काही महिन्यांत याला बाजारात आणू शकते असे म्हटले जात आहे.
या नवीन जनरेशन स्विफ्टच्या CNG व्हेरियंटचे मायलेज देखील उत्कृष्ट असेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान आता आपण या नवीन जनरेशन स्विफ्टच्या सीएनजी व्हेरिएंटचे मायलेज आणि किंमत काय राहू शकते याविषयी माहिती पाहणार आहोत.
मायलेज किती मिळणार?
मीडिया रिपोर्ट नुसार, नवीन इंजिनसह लॉन्च होणारी ही कंपनीची पहिली सीएनजी कार राहणार आहे. CNG इंजिनच्या पॉवरट्रेनची पॉवर आणि टॉर्क पेट्रोल इंजिनच्या तुलनेत कमी असेल, परंतु मायलेज खूप चांगले राहणार आहे.
स्विफ्टच्या CNG प्रकारात फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन मिळू शकते अशी माहिती समोर येत आहे. मायलेज बाबत बोलायचं झालं तर नवीन जनरेशन स्विफ्टचे पेट्रोल व्हेरीयंट सुमारे 24 ते 25 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देत आहे.
मात्र या नव्याने लॉन्च झालेल्या स्विफ्टचे CNG व्हेरियंट 32km/kg पर्यंत मायलेज देऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. मात्र हे सीएनजी व्हेरिएंट कधी लॉन्च होणार याची अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
किंमत किती राहणार?
अलीकडेच लॉंच झालेल्या नवीन जनरेशन स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत ही 6.49 लाख ते 9.64 लाख रुपये दरम्यान आहे. दरम्यान, या पेट्रोल व्हेरियंटच्या तुलनेत सीएनजी व्हेरियंटची किंमत अधिक राहू शकते असे म्हटले जात आहे. आगामी काळात लॉन्च होणारे हे नवीन जनरेशन स्विफ्टचे सीएनजी व्हेरियंट सध्याच्या पेट्रोल व्हेरियंटपेक्षा जवळपास 90 हजार रुपयांनी महाग राहणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.