Ahmednagar News : अहमदनगरमध्ये दुर्दैवी अपघात ! खरेदी- विक्री संघाच्या संचालकाचा मृत्यू

Published on -

Ahmednagar News : अहमदनगरमधून एक अपघाताचे वृत्त आले असून श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या संचालकाचा अपघातात ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झालाय. सुनील पांडुरंग पाटील (वय ४३) (लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी) असे मृताचे नाव आहे.

.हा अपघात रविवारी (दि.१९) दुपारी तीनच्या सुमारास घडला असल्याची माहिती मिळाली आहे. पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतातील वखारीत साठवून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात असताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात श्रीगोंदा खरेदी-विक्री संघाचे संचालक सुनील पाटील (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी असलेले श्रीगोंदा खरेदी-विक्री संघाचे संचालक सुनील पाटील हे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतातील वाखारीत साठवून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी घरून ताडपत्री घेऊन ट्रॅक्टरने बाबुर्डी रस्त्यावरील शेतात जात होते.

कुकडी चारीवर ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी झाला, या वेळी ट्रॅक्टरमध्ये अडकल्याने सुनील पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारपूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुनील पाटील यांचे लहानापासून मोठ्यांपर्यंत मैत्रीपूर्ण संबंध असल्याने घटनेची माहिती समजताच परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताच्या व अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते.

अपघातग्रस्तांची आकडेवारी चिंताजनक आहे. सुसाट वेग, अनियंत्रित वाहने, रस्त्यांची दुरवस्था आदी कारणे अपघात होण्यामागे असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News