Ahmednagar News : टाकळीमियाँ येथील यात्रा उत्सवातील लावण्याच्या कार्यक्रमात धिंगाना घालणाऱ्या तरुणांना मज्जाव केल्याने तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने १७ ते १८ तरुणांची धरपकड करून चार तरुणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री लावण्याचा कार्यक्रम सुरु असताना काही तरुण लावणीच्या ठेक्यावर नाचण्याचा प्रयत्न करीत असताना गोंधळ घालण्यास सुरवात झाली. परंतू गोंधळ घालणाऱ्या रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरूणांनी तेथील जमावाला पोलिसांच्या विरोधात भडकविण्याचा प्रयत्न करून पोलीस व व्यासपीठाच्या दिशेने तेथे पडलेले मातीचे ढेकळे फेकून मारली.
पोलिसांनी १७ ते १८ तरुणांना पकडून राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आणले मात्र, यापैकी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी पोलिसांनी पो.काँ. शिवहरी रंगनाथ दळवी यांच्या फिर्यादीवरुन शरद बबन करपे, योगेश करपे, पप्पू करपे, आकाश दिलीप दरंदले आदीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत पोलिसांवरील हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाळूतस्करांकडूनही पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना ताजा आहेतच. त्यातच आता ही घटना घडली आहे. तसेच इतर मारहाणीचे प्रकारही शहरात सुरु असल्याची उदाहरणे आहेत.
समाजातील समाजविघातक प्रवृत्ती व गुंडागर्दी वाढत चालल्याचे चित्र आहे. कडक कारवाई करत गुन्हेगारांच्या नांग्या पोलिसांनी वेळेतच ठेवल्या पाहिजेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.