भारतीय कार बाजारात मारुती सुझुकी लवकरच लॉन्च करणार ‘ही’ पहिली इलेक्ट्रिक कार ! कधीपर्यंत लॉन्च होणार ?

Tejas B Shelar
Published:

Maruti Suzuki Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. यामुळे देशातील अनेक दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा निर्मितीला प्राधान्य दाखवले आहे. अनेक कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या स्थितीला भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनी धुमाकूळ घालत आहे.

इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीच्या सर्वाधिक गाड्या लॉन्च झालेल्या आहेत. या सेगमेंटमध्ये टाटा कंपनीला अजूनही कोणीच स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी पाहायला मिळत नाहीये. आता मात्र देशात सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी अर्थातच मारुती सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतीय कार बाजारात लॉन्च करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

कंपनी लवकरच पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार असून भविष्यात मारुती सुझुकी आणि टाटा कंपनीत इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दरम्यान आता आपण मारुती सुझुकीच्या या पहिल्या-वहिल्या इलेक्ट्रिक कारची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कधीपर्यंत लॉन्च होणार मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार?

मीडिया रिपोर्टनुसार मारुती सुझुकी कंपनी भारतात 2025 मध्ये आपले पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. eWX ही मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV कार राहणार आहे. ही एक अफॉर्डेबल इलेक्ट्रिक कार राहणार आहे.

ही गाडी टाटा पंच EV, टाटा टियागो EV, MG कॉमेट EV सोबत स्पर्धा करणार असे म्हटले जात आहे. ही गाडी गेल्या महिन्यातच बँकॉक येथे आयोजित झालेल्या मोटर शो मध्ये पाहायाला मिळाली आहे.

ही गाडी मारुती सुझुकीचे वॅग्नर या गाडीचे इलेक्ट्रिक मॉडेल म्हणून बाजारात लॉन्च होणार असे बोलले जात आहे. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 230 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते.

मात्र ही गाडी सिंगल बॅटरी पॅक सोबत येणार की मल्टिपल बॅटरी पॅक सोबत येणार यासंदर्भात अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या गाडीची किंमत ही जवळपास दहा ते बारा लाख रुपये दरम्यान राहणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

या गाडीचे डिझाईन विशेष आकर्षक राहणार आहे. या गाडीला लांब विंडो ग्लास राहणार आहेत. या गाडीत आकर्षक ऍलोय व्हील राहणार आहेत. एकंदरीत पुढील वर्षी अर्थातच 2025 मध्ये मारुती सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक गाडी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

विशेष म्हणजे ही गाडी अफॉर्डेबल प्राइस रेंजमध्ये उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांच्या माध्यमातून देखील या गाडीला पसंती दाखवली जाईल असे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe