Breaking : नाशिक विभाग शिक्षक मतदारसाठी टीडीएफ कडून ‘या’ शिक्षकास आमदारकीची उमेदवारी, कोल्हे-दराडे-विखे यांचे प्लॅनिंग फसले? गणिते बदलणार..

Ahmednagarlive24 office
Published:
KACHARE

महाराष्ट्र राज्य विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात लवकरच निवणूक लागेल. यामध्ये शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चे एक वेगळेच महत्व आहे. टीडीएफकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक बडे लोक प्रयत्नशील होते. यात शुभांगी पाटील यांसह अनेक उमेदवार शयर्तीत होते.

आता शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) या पुरोगामी विचारांच्या संघटनेने अहमदनगर येथील प्रा. भाऊसाहेब कचरे या शिक्षक कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर केली आहे. बुधवारी २२ मे रोजी आझम कॅम्पस, पुणे येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीत प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले.

यावेळी महाराष्ट्र टीडीएफचे महासचिव हिरालाल पगडाल, कार्याध्यक्ष जी. के. थोरात, नाशिक विभाग टीडीएफचे अध्यक्ष संजय पवार (धुळे), आर. एच. बाविस्कर (जळगाव) आदींसह निवड समितीच्या सदस्यांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. टीडीएफ अर्थात शिक्षक लोकशाही आघाडीचे या मतदारसंघात प्राबल्य असल्याचे दिसते. मागील निवडणुकीत टीडीएफ विचारांच्या अनेक शिक्षक उमेदवारांनी उमेदवारी केल्याने टीडीएफ च्या मतांची विभागणी होऊन टीडीएफचा उमेदवार पराभूत झाला होता.

आता उमेदवारीची घोषणा अधिकृतपणे झाल्याने मतविभागणी टाळण्यासाठी इतर इच्छुकांनी सहकार्य करावे व संस्थाचालकांचा शिरकाव झालेल्या या मतदार संघात पुनश्च शिक्षक कार्यकर्त्यालाच विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी टीडीएफ कडून उमेदवारी मिळावी यासाठी विद्यमान आमदार किशोर दराडे (नाशिक),

भाऊसाहेब कचरे (अहमदनगर), निशांत रंधे (धुळे), शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील (नाशिक), आर. डी. निकम (नाशिक), इंदिरा काँग्रेसचे नेते संदीप गुळवे (नाशिक), एन. डी. नांद्रे (नंदुरबार), अर्जुन कोकाटे (अहमदनगर), नीलिमा आहिरे (नाशिक) यांनी शिक्षक लोकशाही आघाडीकडे मुलाखती देऊन उमेदवारी मागितली होती. दरम्यान आता यांना डावलून खरे यांना उमेदवारी दिली आहे.

शिक्षक हाच शिक्षक आमदार असावा. मागील निवडणुकीत निवडून आलेले आमदार टीडीएफ विचारधारा मानणारे नव्हते तसेच त्यांचा शिक्षक चळवळीशी कुठलाही संबंध नव्हता. त्यामुळे या विभागातील शिक्षक व शिक्षक कार्यकत्यांनी यावेळी शिक्षकांचा प्रतिनिधी हा संस्थाचालक नव्हे तर शिक्षक कार्यकर्ताच असावा असा आग्रह धरला होता,

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवेमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यांच्या समस्या याची जाण असणारा शिक्षकच आमदार असावा असे प्रतिक्रिया प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी दिली आहे.

कोल्हे-दराडे-विखे यांचे प्लॅनिंग फसले?
पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस वा भाजप अशा दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचा पर्याय असतानाही शिक्षक लोकशाही आघाडी समर्थक मते मिळावीत म्हणून अपक्ष निवडणूक लढवली. त्याच पॅटर्ननुसार आता जिल्ह्यातून विवेक कोल्हे व डॉ. राजेंद्र विखे यांच्या उमेदवारीची शक्यता असल्याच्या चर्चा होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe