Samsung Galaxy : सॅमसंग लवकरच लॉन्च करत आहे सर्वात स्लिम फोन, किंमतही खूपच कमी…

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सॅमसंग प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. कारण सॅमसंग लवकर बाजारात आपला एक बजेट फोन लॉन्च करणार आहे. कपंनी Samsung Galaxy F55 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

नुकताच शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर फोनचा टीझर रिलीज केला गेला आहे. फोनच्या टीझरसोबतच त्याच्या किंमतीबाबतही संकेत देण्यात आले आहेत. बॅनरवर लिहिले आहे की त्याची किंमत 2X,999 रुपयांपासून सुरू होईल. हे पाहता हा फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला जाईल असे दिसते आहे.

हा फोन या सेगमेंटमधील सर्वात स्लिम फोन आहे. लॉन्च होण्यापूर्वी फोनचा रंगही समोर आला आहे. फोन दोन रंगपर्यायांसह लॉन्च केला जात आहे. फोनमध्ये अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसर असेल आणि 12 GB पर्यंत रॅम असेल. या सॅमसंग फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सॅमोलेड डिस्प्ले असेल.

फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह प्रदान केला जाईल, आणि तो 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Samsung Galaxy F55 5G मध्ये FHD रिझोल्यूशनसह मोठा 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असल्याचे म्हटले जाते. हा फोन पंच-होल स्क्रीन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह ऑफर केला जाईल. हा फोन बॅटरी वाचवण्यासाठी आणि वेळ आणि सूचना दर्शविण्यासाठी नेहमी-ऑन वैशिष्ट्यास देखील सपोर्ट करेल.

कॅमेरा फीचर्स

कॅमेरा म्हणून, या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्स, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह मागील बाजूस ट्रिपल-रिअर कॅमेरा सिस्टम असेल. मुख्य लेन्सला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट असल्याचे समोर आले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. याच्या कॅमेऱ्याने 4K व्हिडिओ शूट करता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe