मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्र ‘असा’ बरसेल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  मान्सून आणि हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेटच्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी 30 मे रोजीच केरळात दाखल झाला आहे. यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे.

हवामान विभागाने, गेल्या आठवड्यात मान्सून 1 जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून 1 जूनपूर्वीच दाखल झाला असून जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

2 ते 4 जून दरम्यान मुंबई व उपनगरामध्ये पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कोकण गोव्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.

मान्सून साधारणत: 1 जून रोजी केरळात दाखल झाल्यानंतर 5 जून रोजी गोवा, कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश आणि ईशान्य या राज्यांमध्ये पोहचता.

मात्र यावेळी मान्सूनच्या लवकर येण्यामुळे पाऊसही लवकरच सुरु होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानुसार, 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाखल होऊ शकतो.

याशिवाय 15 जून रोजी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment