अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या बांधकाम व्यवसायासह त्याच्याशी संलग्न असलेले २५० उद्योगधंदे आणि व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आले आहेत.
शासनाने या क्षेत्रास उभारी देण्यासाठी गृहकर्ज स्वस्त केले. परंतु तरीही घरांच्या विक्रीत वाढ होणार नाही किंबहुना येत्या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांची विक्री तब्बल ३० टक्क्यांनी कमी होईल,
असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत या क्षेत्रास व या संबंधी व्यवसायांस एकूण एक लाख कोटी रुपयांचा तोटा होईल.
केपीएमजी या प्रख्यात सल्लागार संस्थेने देशातील गृहनिर्माण, व्यावसायिक बांधकामे, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांवरील कोरोना प्रभावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.
२०१९-२० या आर्थिक वर्षांत देशांत ४ लाख घरांची विक्री झाली होती. यंदाच्या आर्थिक वर्षांत त्यात तब्बल १ लाख २० हजारांची घट होईल आणि २ लाख ८० हजारांपर्यंतच्या घरांचीच विक्री होऊ शकेल, असा अंदाज आहे.
त्यामुळे स्टीलपासून ते रंगापर्यंत आणि सिमेंटपासून ते दरवाजे-खिडक्या निर्मिती करणाऱ्यांपर्यंतच्या तब्बल २५० उद्योगांवर परिणाम होणार आहे.
६ ते १२ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरक्षित निवाऱ्याची गरज पूर्ण करण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे घरांच्या खरेदी-विक्रीला थोडीफार चालना मिळू शकेल, असा आशावाद या अहवालात नमूद केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews