अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-भारतीय क्रिकेट चॅम्पियन हार्दिक पंड्या आणि टेलिव्हिजन अभिनेत्री नताशा स्टँकोविच ही चर्चेत असणारी जोडी आहे. 2020 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी रोजी पंड्याने एंगेजमेंटचा फोटो शेअर करत सुखद धक्का दिला होता,
आता हार्दिकने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यास उत्साहित असल्याचं त्याने लिहिलं आहे.
यासोबतच एका पारंपारिक सोहळ्याचेदेखील फोटो त्याने शेअर केलेत, ज्यामध्ये हार्दिक आणि नताशा या दोघांच्या गळ्यामध्ये वरमाला दिसत आहेत.
त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची खबर असणार आहे. ‘नताशा आणि माझा इथपर्यंतचा प्रवास खूप मोठा होता, आणि आता आम्ही लवकरच आमच्या जीवनात नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत.
‘ असं फोटो कॅप्शन हार्दिकने दिलंय. आता गळ्यातील वरमाला पाहून “हार्दिक आणि नताशाने लॉकडाऊनमध्येच लग्न केलं की काय!” असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews