पॅरासिटामॉल गोळीसंदर्भात केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर सर्वात आधी भारतात पॅरासिटामॉल औषध घेण्याची परंपरा आहे. बहुतांश भारतीय वर्षभरात किमान एकदा तरी पॅरासिटामॉल औषधाचे सेवन करतात.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पॅरासिटामॉलसह काही औषधे आणि औषधांच्या निर्यातीवर प्रतिबंध आणण्यात आले होते. मात्र आता पॅरासिटामॉलच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली आहे.

पॅरासिटामॉल आरोग्याला अपायकारक असल्याचं सांगत केंद्र सरकारनं या औषधावर बंदी आणली होती. औषध नियंत्रक विभागाने (डीसीजीआय) तसेच अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पॅरासिटामॉल औषधावर कडक बंधने घातली होती.

मात्र आता सरकारने पॅरासिटामॉल औषधावरील निर्यात बंदी मागे घेतली आहे. बंदीपूर्वी त्याच्या मागणीत वाढ झाली होती. त्यानंतर देशात या औषधाची कमतरता नव्हती, हे लक्षात घेता सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

पॅरोसिटामॉलच्या निर्यातीवर बंदी असूनही, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने गेल्या दोन महिन्यांत सुमारे 120 देशांना पॅरासिटामॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधांचा पुरवठा केला आहे.

गेल्या महिन्यात सरकारनं टिनिडाझोल, मेट्रॅनिडाझोल, अ‍ॅसिक्लोव्हिर, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, क्लोराम्फेनीकोल या औषधांवरील बंदी हटवली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment