संगमनेर :- तालुक्यातील एका तीस वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
मनोज वसंत कांगणे (रा. हंगेवाडी, ता. संगमनेर) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अत्याचाराच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यातील आरोपी मनोज वसंत कांगणे याने २५ मार्च २०१८ ते १ मे २०१९ या कालावधीत फिर्यादी युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
याबाबत कोणाला काही सांगितले, तर तुझी बदनामी करून तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली.
याप्रकरणी आई वडिलांसमवेत पोलीस ठाणे गाठत पीडित युवतीने फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- थोरात साखर कारखान्याच्या २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध, सहकारात आपलाच दबदबा असल्याचे थोरातांनी राजकीय डावपेचातून विरोधकांना दिले दाखवून
- संत शेख महंमद देवस्थानचे इस्लामीकरण होऊ देणार नाही, अक्षय महाराज भोसले यांचा इशारा
- पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्यातील ‘या’ 9 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार, यात तुमच्या भागातील Railway Station आहे का ?
- मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला सुरू होणार मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका !
- महाराष्ट्राला दुष्काळमु्क्त करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल! नदीजोड प्रकल्पाला भरीव निधी देणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची घोषणा