अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कोरोना महामारीच्या संकटामुळे नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या आषाढी पंढरपूर वारी दिंडी सोहळा रद्द करण्यात आल्याने नेवासे वारीची ५१ वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे
नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत कोरोनाच्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दिंडी सोहळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून विश्वस्त मंडळाने दिंडी सोहळा रद्द करण्याचा हा निर्णय घेतला आहे.
आता यावर्षी एकादशीच्या आदल्या दिवशी शासनाची परवानगी घेऊन पंढरपूरला संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका नेल्या जातील तेथे चंद्रभागा नदीत पादुकांना अभिषेक घालण्यात येईल त्यानंतर आरती व क्षेत्र प्रदक्षिणा घालून पादुका पुन्हा नेवासे येथे आणल्या जातील,
असा निर्णय झाल्याचे शिवाजी महाराज देशमुख यांनी सांगितले. देशात व महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आल्यानंतर शासन निर्णयामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर देखील बंद आहे.
राष्ट्रीय कर्तव्य समजून यंदाची आषाढी वारी दिंडीही रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले,
विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, भिकाजी जंगले, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माउली शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews