अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :महापालिकेत सत्ताधारी भाजपने नगरसेवकांसाठी योजनेचे समन्ययक हे नवीन पद निर्माण करून नगरसेवक मनोज कोतकर यांची अमृत योजनेच्या समन्वयकपदी नियुक्ती केली.
योजनेच्या समन्वयकपदी नगरसेवकांची नियुक्ती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता इतर योजनांवर देखील अन्य नगरसेवकांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेमार्फत अमृत योजना राबविण्यात येत आहे. १२५ कोटी रुपये खर्चून भुयारी गटारीसह जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या योजनेला गती मिळावी, यासाठी कोतकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तसे पत्रही दिलं. महापालिकेकडून शहर सुधारित पाणीपुरवठ्यासह अन्य योजना राबविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरसेवकांची समिती नियुक्ती करण्याची मागणी पुढे आली होती.
परंतु, या योजनेसाठी समिती नियुक्त करण्यास टाळाटाळ केली. पण कोतकर यांची घाईघाईत नियुक्ती केली. त्यापुळे आता इतर योजनांवर अन्य नगरसेवकांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews