भाविकांना लागली साई दर्शनाची आस !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले. या घटनेला बुधवारी (दि.१७) तीन महिने पूर्ण झाले आहेत. तिरुपतीसारखी देशातील अन्य मंदिरे आता खुली झाल्याने साई भक्तांसह शिर्डीकरांनाही साई दर्शनाची आस लागली आहे.

साईनगरीत देश-विदेशातील भाविकांचा वावर लक्षात घेता कोरोनाचा प्राथमिक उद्रेक सुरू होताच संस्थानने १७ मार्चला मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला.

जवळच्या गावातील नागरिकांच्या संपर्कामुळे साईनगरी ग्रीनझोन मध्येच राहिली. केंद्र व राज्य सरकार आता जनजीवन सुरळीत करण्यासाठी पावले उचलत आहेत.

त्यामुळे अर्थचक्र फिरु लागले आहे. शिर्डीत मात्र जवळपास ९९ टक्के व्यवसाय साईमंदिर व भाविकांवर अवलंबून आहेत. मात्र आजही शिर्डी लॉकडाऊनच आहे.

तिरूपती मंदिर सुरु केले असले तरी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण असल्याने राज्यात मंदिरे बंदच आहेत.

राहाता, निमगाव भागात अनेक रूग्ण सापडल्याने मंदिर उघडण्यासाठी आणखी किती कालवधी लागेल हे सांगणे सध्या कठीन आहे. साईमंदिर बंद असल्याने शिर्डी परिसरातील अर्थचक्र थांबलेलेच आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment