अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : कोपरगावात महावितरणने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ तर केले नाहीच, परंतु चढ्या दराने बिल पाठवून जनतेला वेड्यात काढण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने, तसेच महावितरणने केले.
तीन महिन्यांचे बिल माफ करा किंवा सात ते साडेसात रुपये युनिटप्रमाणे दर आकारा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली.
याबाबत आठ दिवसात निर्णय न घेतल्यास महावितरणसमोर वीजबिलांची महाहोळी करण्याचा इशाराही त्यांनी दिला. निवेदनात म्हटले आहे, कोरोना महामारीमुळे कोणालाही घराबाहेर येता येत नव्हते.
त्यामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, मोबाइल, एसी यांचा वापर जास्त झाला. सरकारने कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु अता तीन महिन्यांचे बिल आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews