अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने संक्रमणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
उत्तरतेतील एका लोकप्रतिनिधीस कोरोनाची बाधा झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीरामपूर शहरात कोरोनाबाधित लोकप्रतिनिधीच्या संपर्कात आलेले
‘त्या’ नऊ राजकीय प्रतिष्ठांनी स्वतःहून रुग्णालयात जावून घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. यात उपनगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, कॉगे्रेस शहराध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती, आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
तीन दिवसानंतर हे अहवाल प्राप्त झाले. या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला. श्रीरामपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
काल पुन्हा श्रीरामपूर शहरात सहा रुग्ण आढळून आले आहेत. वॉर्ड नं. 2, सुभेदार वस्ती भागात 4 तर ‘त्या’ अधिकार्याच्या कुटुंबातील आणखी दोघांना करोनाची लागण झाली आहे.
श्रीरामपूर शहर व तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 30 वर जावून पोहोचली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.
वॉर्ड नं. 2 मध्ये कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यामुळे तसेच कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्यामुळे हा भाग कंटेन्टमेंट झोन जाहीर केला.
यामुळे या भागातील सर्व भाग सील करण्यात आला होता. मात्र काल पुन्हा चार अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे वॉर्ड नं. 2 मधील सर्व लहान मोठे रस्ते सील करण्यात आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews