अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार प्रशासनाने टेस्टिंगचे प्रमाणही वाढविले आहे. त्यानुसार आज २१ जणांना कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
परंतु यामध्ये नगर तालुक्यातील अरणगाव आणि हिवरेबाजार येथे रुग्ण आढळले, असा उल्लेख होता. त्यामुळे या गावांत घबाराट पसरली.
परंतु काही वेळानंतर या दोन्ही गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. अरणगाव रोडवरील महापालिका हद्दीतील विद्यानगर येथील पाच,
तर हिवरेबाजार या गावाऐवजी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एक रुग्ण असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews