अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे.
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून काल एकूण 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर बाहेर गावाहून आलेल्या तिघा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यात आतापर्यंत एकूण 305 कोरोना संक्रमित आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
तालुक्यातील निमोण येथील 65 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, 59 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, 12 व 14 च्या मुली, 21 वर्षीय तरुणी,
65 वर्षीय महिला, 16 वर्षांचा मुलगा तर शहरातील देवीगल्ली येथील 60 वर्षीय पुरुष, लखमीपुरा येथील 50 वर्षीय पुरुष, मालदाड रोेड येथील 50 वर्षीय पुरुष,
46 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, रहेमतनगर येथील 24 वर्षीय तरुण, 44 वर्षीय महिला, घोडेकरमळा येथील 49 वर्षीय पुरुष, तर बाहेर गावाहून आलेल्यांमध्ये नान्नज दुमाला येथे मुंबईहून आलेले दोन व्यक्ती पॉझिटिव्ह तर शहरातील शिवाजीनगर येथे नाशिकहून आलेली एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]