‘ह्या’तालुक्यात ढगफुटी; अनेक मोटारसायकली गेल्या वाहून

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने चांगला जोर धरला आहे. काल (शुक्रवार) श्रीगोंदा शहरात ढगफुटी झाली.

यामुळे आलेल्या पाण्याने साळवण देवी रोडवरील सुधाकर रायकर यांच्या कुक्कुटपालनमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने २०० कोंबड्या वाहून गेल्या.एका अपार्टमेंटमधील २४ मोटारसायकली वाहून गेल्या आहेत.

मुसळधार पावसाने सरस्वती नदीला पूर आल्याने लेंडी नाल्याचे पाणी साळवण देवी रोड परिसरात घुसले.दौंड-जामखेड रोडवरील रुक्मिणी बँकेशेजारी असलेल्या

एका खताच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकाचे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाचा कहर आणि आता नैसर्गिक आपत्ती या दोन्ही संकाविरोधात सध्या शेतकरी लढत देत आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment