अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- भरघाव वेगात आलेल्या मुरुमाच्या डंपरने दुचाकीला घडक दिल्याने दुचाकीवरील ७ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. या अपघातात मयत मुलाचे ३५ वर्षीय वडील गंभीररीत्या जखमी झाले.
कनगर – राहुरी रोडवर ही घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि मुरुमाचा डंपर कनगरकडून राहुरीच्या दिशेने चालला होता. समोरुन किराणा सामान भरुन दुचाकीवर घरी जात असलेले बबन उंडे,

आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा कार्तिक यांना डंपरने जोराची धडक दिली. या धडकेने कार्तिक हा रस्त्यावर उडून पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. बबन उंडे यांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. कार्तिक यास शवविवच्छेदनासाठी राहुरी येथे नेण्यात आले होते.
कार्तिक हा आई वहिलांना एकुलता एक मुलगा असल्याने उंडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने कनगर परिसगत हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा