नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-साईबाबा काॅर्नरवरील मोठ्या खड्ड्यासमाेर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अनेक ठिकाणी या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेकदा निवेदने दिली.

मात्र, काम होत नाही. एकीकडे टोल वसुली चालू आहे. टोल कंपनी आपल्या अधिपत्याखाली काम करते. आपण त्वरित रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे भरून काढा.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव गेलेला खपवून घेतला नाही. त्वरित दुरुस्तीला सुरुवात करा, अन्यथा परिणामास तयार रहा, असा इशारा युवा नेते सुमित कोल्हे यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिला.

मागील तीन दिवसांपूर्वी सिंधुताई कोल्हे यांचे वाढदिवसानिमित्ताने साईबाबा काॅर्नर लगत वृक्षारोपण चालू असताना तेथे खड्ड्यात दुचाकीस्वाराचा अपघात झाला.

सुमित कोल्हे तेथेच होते. त्यावेळी अभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली होती.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]