साईबाबा मंदिरातील जल, साईनगरीची माती राम मंदिरासाठी रवाना

Published on -

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अयोध्येतील राममंदिरचा वाद खूप काळ सुरु होता. शेवटी न्यायालयाने हा वाद निकाली काढून अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद थांबवला.

आता राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

काशी येथील ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास होणार आहे. यासाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील पवित्र जल,

साईनगरीची माती आणि बाबांची उदी राम मंदिराच्या पायभरणीसाठी मागवण्यात आली आहे. विश्वहिंदू परिषदेच्या वतीने काल सकाळी साईमंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक चार समोर या सामुग्रीची विधिवत पूजा करण्यात

आली असून रामंदिरचे कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी साईबाबाकडे प्रार्थना केली असल्याचे विश्वहिंदू परिषदेचे राहाता तालुका प्रखंडमंत्री सुरेंद्र महाले यांनी यावेळी सांगितले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News