अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-कोपरगाव तालुक्यातील हनुमाननगरमधील तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. सागर राजू पाटील (वय २२) असे त्याचे नाव आहे.
राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. शेजारी राहणाऱ्या आकाश राजू मोरे यांनी शहर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

file photo
सागर गवंडी काम करत होता. घरात तो व त्याचे वडील असे दोघे जणच रहात होते. सागरने आत्महत्या केल्याचे वडिलांनी पाहिले,
परंतु ते अर्धांगवायूने ग्रस्त असल्याने काही करू शकले नाहीत. सागरने आत्महत्या का केली याबाबतचा तपास पोलिस सध्या करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा