अंकिता लोखंडेने सुशांत मृत्यूप्रकरणी सोडले मौन; म्हणाली ‘तो डिप्रेशन मध्ये नव्हता’…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सुशांतसिंग राजपूत आता या जगात नाही. सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

मानसिक तणावामधून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आता अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांनी यावरील मौन सोडले असून प्रथमच यावर तिने भाष्य केले आहे.

अर्णव गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अंकिता म्हणाली, सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी जेव्हा समजली तेव्हा ही गोष्ट स्वीकारण्यास बराच वेळ लागला. पण मला सर्वांना सांगायचं आहे की सुशांत हा निराश होणाऱ्या व्यक्तींपैकी नव्हता.

एखाद्या गोष्टीचा त्रास होईल आणि तो आत्महत्या करेल असा स्वभाव त्याचा नव्हता. तो आनंदी माणूस होता. कदाचित मी आणि सुशांतने जीवनात याही पेक्षा वाईट परिस्थितींचा सामना केला आहे.

त्यामुळे मला जितका सुशांत माहित आहे त्यानुसार तो उदास होणार्यापैकी व्यक्ती नव्हता. अंकिता म्हणाली ‘मी सुशांतसारखी व्यक्ती पाहिली नाही.

तो स्वतःची स्वप्ने लिहीत असे. आणि आपली स्वप्ने पूर्ण करायचा. जेव्हा असे म्हणतात की तो डिप्रेशनमध्ये होता तेव्हा तो त्याच्यासाठी खूप चुकीचा शब्द आहे.

‘तो निराश होऊ शकत नाही. त्याला एखाद्या गोष्टीची चिंता वाटू शकते. पण उदासीनता नाही. सुशांत आणि अंकिता 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे लग्न होणार होते पण अचानक दोघांनीही आपला मार्ग बदलला. पवित्र रिश्ता या शोच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले होते.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News