अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 173 वर्षांची परंपरा असणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले होते.
परंतु 173 व्या अखंड हरिनाम सप्ताह परंपरा खंडीत न होता, साध्या पध्दतीने श्री श्रेत्र सराला बेटावर पार पडला. त्याची सांगता काल झाली.

शासकीय आदेशाने सोशल डिस्टंशिंग पाळुन व साध्या पध्दतीने हा सोहळा पार पडला. भाविकांना या सप्ताहाला उपस्थित राहता आले नसले तरी त्यांना सोशल मीडिया, टिव्ही, वृत्तपत्र या माध्यमातून या सप्ताहाचा आस्वाद घेता आला.
या सांगतेला सप्ताह समितीचे अध्यक्ष वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरणारे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, कापसे पैठणी उद्योगसमुहाचे संचालक बाळासाहेब कापसे, नागेबाबा मल्टिस्टेटचे कडूभाऊ काळे,
बाबासाहेब चिडे, डॉ. धनंजय धनवटे, बाबसाहेब जगताप, संतोष जाधव, कृष्णभाउ डोणगावकर, मधु महाराज, बाळासाहेब रंजाळे महाराज, चंद्रकांत सावंत महाराज, मधुसूदन महाराज हे उपस्थित होते.
महंत रामगिरी महाराज यांनी काल्याचे किर्तन केले. पाच ऑगस्टला श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे पूजन होणार आहे. 500 वर्षाचा संघर्ष आहे. आता हा भूमिपूजन सोहळा होत आहे.
त्या दिवशी सर्वांनी आपल्या घरासमोर सडे, रांगोळ्या काढा, कारण आपल्या आयुष्यात हा योग आला आहे. योग आपल्याला प्राप्त होत आहे. सकाळी 10 वाजता श्रीरामा चे पूजन करा, घरात करा, प्रतिमेचे पूजन करा, रामरक्षा म्हणा,
भगवा ध्वज घरावर लावा, भगवा रंग हा त्यागाचा रंग, नियमाचे पालन करुन, दिपावली पेक्षा हा आनंदाचा क्षण, आनंदोत्सव घरातच साजरा करावा. असे महंत रामगिरी महाराज म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा