‘ह्या’ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; पिकांचे नुकसान, रस्ते झाले बंद

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी अतिवृष्टीच्या, वादळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे.

नेवासे तालुक्यात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्याला मोट्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नेवासा शहरात येणारे रस्ते बंद झाले.

नेवासा-खडका फाटा रस्त्यावर असलेल्या काजी नाला ओढ्याला पूर आल्यामुळे दुपारपर्यंत रस्ता बंद झालेला होता. तसेच रानमळ्याकडे व उस्थळदुमालाकडे जाणारा रस्ता पूर आल्यामुळे बंद झाला होता.

खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी रात्री नेवासा तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार वादळी पाऊस कोसळला. सर्वाधिक पाऊस वडाळा बहिरोबा येथे 135 मिलिमीटर पडला तर तालुक्यात सरासरी 76.75 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यातील नेवासा खुर्द (120मिमी), वडाळा बहिरोबा (135 मिमी) व सलाबतपूर (126 मिमी) या तीन मंडलात ढगफुटी सदृश पाऊस झाला.

नेवासा तालुक्यात 127 महसुली गावे असून या गावासाठी 8 महसूल मंडले आहेत. मंडल निहाय झालेला गुरुवारचा पाऊस (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) आकडेवारी मिलीमीटरमध्ये अशी.

सोनई – 56 (698), नेवासा खुर्द-120 (530), वडाळा बहिरोबा- 135 (640), कुकाणा-35 (407), घोडेगाव 48 (489), सलाबतपूर -126 (596), चांदा -76 (550), नेवासा बुद्रुक -18 (438) .

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]