अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-कोपरगावमध्ये करोनाचा कहर वाढतच चालला आहे. शहरात काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ५२ व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे.
यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर खाजगी लॅबमध्ये एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज दुपारपर्यंत एकूण १२ बाधीत आढळले आहे. तसेच ३० जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
आज शहरातील इंदिरानगर येथील ५० वर्षीय महिला, गांधीनगर येथील ४५ व २६ वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर येथील ६४ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय महिला,
गुरुद्वारारोड येथील २५ व ४२ वर्षीय पुरुष, सुभाषनगर येथील ५० वर्षीय पुरुष, बैलबाजार रोड येथील ५२ वर्षीय पुरुष तसेच तालुक्यातील पढेगाव येथील ८ वर्षीय मुलगा,
तालुक्यातील मंजूर येथील एक ६० वर्षीय महिला तर कोळेवाडी येथील २० वर्षीय तरुणाचा यामध्ये समावेश आहे. कोपरगाव तालुक्यात ऐकून ११२ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून त्यातील ७३ रुग्णावर उपचार सुरू आहेत,
एक महिला मयत झाली असून 38 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. संपूर्ण जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसची दहशत आता कोपरगाव शहरासह तालुक्यात देखील गडद होत आहे.
दिवसेंदिवस कोपरगाव करोना बाधित रुग्णांनाचा आलेख हा वाढताच आहे. नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने गरज असल्यास घरा बाहेर पडण्याचे अवाहन केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा