अकरावीचे प्रवेश उद्यापासून होणार सुरु असे आहे वेळापत्रक

Published on -

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद असल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडला होता. काहीदिवसापूर्वीच निकाल जाहीर झाल्याने उद्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. 

राज्य सरकारच्या आदेशानूसार जिल्ह्यात शहरी भागात ऑनलाईन तर ग्रामीण भागात सुविधा नसल्यास ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यांना काढले आहेत.

माध्यमिक शिक्षण विभागाने मंगळवारी सकाळी काढलेल्या आदेशात जिल्ह्यात 5 (उद्यापासून) ते 17 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सांगितले आहे. करोना संसर्गामुळे यंदा जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी व प्रवेश फीसाठी

सर्व कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांनी स्वंत्रत ऑनलाईन लिंक तयार करून त्याव्दारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, शहरी भागात ही प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने तर ग्रामीण भागात ऑनलाईनची सुविधा नसल्यास त्याठिकाणी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी.

तसेच हे करत असतांना विद्यार्थी आणि पालकांना सॅनिटायझर उपलब्ध करून देत सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करण्यात यावे. तसेच प्रवेश प्रक्रिया राबवितांना मार्गील वर्षीची जातनिहाय टक्केवारी विचारात घेवून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी काढले आहेत.

  • असे आहे वेळापत्रक

    5 ते 17 ऑगस्ट विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाकडे दहावीच्या ऑनलाईन गुणपत्रिकेच्या आधारे अर्ज सादर करावेत.

    18 ते 22 ऑगस्ट दरम्यान दाखल अर्जाची महाविद्यालय पातळीवर छानणी करण्यात येईल.

    23 ऑगस्टला प्रथम गुणवत्ता यादी प्रसिध्द होवून या दिवसापासून 28 तारखेपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला आणि जातीचा दाखला यानूसार प्रवेश देण्यात येणार आहे.

    3 सप्टेंबरला दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करून 4 ते 8 सप्टेंबर दरम्यान दुसरी गुणवत्ता यादीनूसार शाळा सोडल्याचा दाखला आणि जातीचा दाखला यानूसार प्रवेश देण्यात येणार आहे.

    10 सप्टेंबरला संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयात जागा शिल्लक राहिल्यास तिसरी गुणवत्त यादी प्रसिध्द करून त्यानूसार प्रवेश देण्यात यावा.  
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News