अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोपरगावसह संजीवनी कारखाना परिसर व २२ गावांत ६५ रुग्ण बाधित निघाले असून त्यात २५८ अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये ६१ बाधित निघाले आहे, तर खासगी प्रयोग शाळेत २ रुग्ण बाधित निघाले.
यात एक १० महिन्याचे बाळ व ब्राम्हणगाव येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.त्यामुळे आजपर्यंत निघलेल्या रुग्णांचा गुरुवारी उच्चांक मानला जात आहे.
आता ग्रामीण भागही कोरोनाने विळख्यात कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर येथील सारीचा रुग्ण धरून तीन बळी गेले आहेत. आतापर्यंत तालुक्यात शहरासह या पूर्वीच २७४ रुग्ण बाधित झाले.
कोपरगाव शहर व उपनगरे मिळून एक स्त्री आणि १० पुरुष रुग्ण आढळले. संजीवनी कारखाना परिसर ७ महिला, ११ पुरुष, शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत ४ महिला आणि २ पुरुष, पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत २ महिला,
सांगवी भुसार हद्दीत २ पुरुष, ब्राम्हणगाव येथे २ महिला आणि १ पुरुष, चांदेकसारे हद्दीत १ पुरुष, तर येसगाव येथे २ पुरुष बाधित आढळले. शिरसगाव येथे एक पुरुष, टाकळी आणि डाऊच बुद्रूक येथे प्रत्येकी दोन पुरुष,
कोळगाव थडी, निमगाव, रवंदे, मंजूर, सोनारी, अंचलगाव,देर्डे-कोऱ्हाळे, देर्डे चांदवड, आपेगाव, कोकमठाण, कारवाडी, देवगाव येथे प्रत्येकी एक पुरुष बाधित आढळला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved