आदिवासी विद्यार्थ्यांच्या ई- लर्निंग बाबत माजी आ.पिचड यांची शिक्षणमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ असल्याने अद्याप शाळा सुरु करणे धोक्याचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ई- लर्निंग ही योजना अमलात आणली गेली. महाराष्ट्रात आता ऑनलाईन शिकवले जात आहे.

परंतु अकोले सारख्या दुर्गम भागात विद्यार्थ्यांना रेंज नसल्याने आणि येथील जनता गरीब असल्याने त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत अँड्रॉईड मोबाईल किंवा टॅब उपलब्ध करून

द्यावे व ज्या भागात मोबाईलला रेंज नाही त्या भागात टॉवर उभे करावे, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी आमदार पिचड यांनी पत्रात लिहिले आहे की, लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे.

कुटुंब चालविणे फार मोठे मुश्कील झालेले आहे. अकोले मतदारसंघामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे शिक्षण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व त्यांच्या प्रगतीवर परिणाम होऊ नये यासाठी आपल्या स्तरावरून ई-लर्निंगचे शिक्षण देणेबाबत सूचना व आदेश प्राप्त झालेले आहेत.

तथापि अकोले तालुक्यामध्ये बहुतांशी पालक हे गरीब कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल व टॅब खरेदी करणे व ते वापरणे त्यांना परवडणारे नाहीत. तशातच तालुक्यातील बहुतांश भाग आदिवासी व अतिदुर्गम आहे. याठिकाणी मोबाईल टॉवर नाहीत.

त्यामुळे मोबाईल नेटवर्कही नाही. म्हणून या तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील मुले या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून, आपल्या स्तरावरून अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, टॅब मोबाईल, एरियल टॉवर, तसेच मोबाईल टॉवर उपलब्ध होणेबाबत संबंधितांना सूचना व आदेश व्हावेत, असे पत्र माजी आमदार पिचड यांनी दिले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News