ही आहेत राज्यातील प्रसिद्ध गणेश मंदिरे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते.

महाराष्ट्रातील प्रत्येक गावात गणपतीचे एक-दोन मंदिरे पाहण्यास मिळतात. या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना खास महत्त्व आहे.

या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. पुणे शहराच्या जवळ आठ मंदिरे आढळतात. याशिवाय मुंबईच्या सिद्धिविनायक व टिटवाळ्याच्या गणपतीचा समावेश होतो.

कोकणातील गणपतीपुळ्याचे मंदिर विख्यात आहे. पुण्यात सारसबाग येथील उजव्या सोंडेचा गणपती प्रसिद्ध आहे. कसब्यातील ह्या गणपतीची पूजा जिजाबाई करत असत.

जळगाव येथे उजव्या व डाव्या सोंडेच्या गणपतीचे एकत्रित मंदिर आहे. अशा स्वरूपाचे एकत्र मंदिर दुर्मिळ आहे. वाईच्या ढोल्या गणपतीची विशालकाय मूर्ती प्रेक्षणीय आहे.

  • पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री),
  • रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली)
  • अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक)
  • या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत.
  • या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment