ह्या तालुक्यात कोरोनाचा कहर, एकही आमदाराचे नाही लक्ष….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  गेल्या काही महिन्यांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

मात्र,अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. नगर तालुका हद्दीत सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात नगर शहरापाठोपाठ नगर ग्रामीणला कोरोना बाधितांची संख्या इतर तालुक्यांपेक्षा अधिक आहे.

महापालिका हद्दीमध्ये 6 हजार 331 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर नगर ग्रामीणला (तालुका) 1 हजार 696 कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोना महामारीने मार्च 2020 पासून जगभरात धुमाकूळ घातला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आवड्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले.

परंतु, कोरोनाची साखळी तुटली नाही. सध्या दररोज जिल्ह्यात 500 ते 700 कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. महापालिका हद्दीत 6 हजार 331 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 5 हजार 599 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत 18 हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी 14 हजार 500 पेक्षा अधिक रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

नगर तालुक्याला तीन आमदार असले तरी ‘ना घर का, ना घाट का’ अशी स्थिती आहे. संगमनेर, जामखेडमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचा राज्यात गवगवा झाला.

संगमनेरमध्ये ना. बाळासाहेब थोरात यांनी व जामखेडमध्ये आ. रोहित पवार यांनी लक्ष घालून वेळोवेळी उपाययोजना राबवून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणला आहे.

परंतु, नगर तालुक्याकडे ना. प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ. बबनराव पाचपुते यांनी कोणीच लक्ष दिले नसल्याची भावना नगर तालुक्यातील नागरिकांच्या मनात वाढीस लागली आहे. नगर ग्रामीणला एक हजार 696 रुग्ण आढळून आले असून 974 जण बरे होवून घरी परतले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment