अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेत क्रीडा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला . हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
पण आज कोरोना संकटाच्या काळात सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे यावर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन मुख्याध्यापक आर .टी . शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन पद्धतीने साजरा केला.
याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशालेचे माजी खेळाडू राहुल खेडकर हे सध्या जपान देशातील टोकीओ येथे आहे. तेथून संवाद साधताना जीवनातील खेळाचे महत्व याविषयी माहिती सांगितली.
खेळाडू शिल्पा गायकवाड , संजय वाळके , पायल खेसे , सुयश कौठाळे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशालेचे क्रीडाशिक्षक संदीप घावटे यांनी केली.
क्रीडा प्रतिज्ञेचे वाचन क्रीडाशिक्षक सतीश झांबरे यांनी केले .अमोल कातोरे, संजया नितनवरे , पर्यवेक्षक संपतराव गाडेकर यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. सर्व आजी माजी खेळाडू व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved