अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अद्यापही जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत आहेत. जिल्ह्यात सोमवारी (३१ आॅगस्ट) तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने वाढ झाली. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, यामुळे उपचार सुरू असणा-या रुग्णांची संख्या आता ३ हजार ९१ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११२, संगमनेर ४, राहाता २, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर १, नेवासा १, पारनेर १, अकोले २१, राहुरी १७, कोपरगाव ३, जामखेड १२, कर्जत ३ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत नगर जिल्ह्यात २९० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २१ हजार २५७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली. कोरोना महामारीने मार्च 2020 पासून जगभरात धुमाकूळ घातला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आवड्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता कोरोनाची लस कधी येते याकडे लक्ष लागलं आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved