प्रसूतीनंतर ‘ती’च्या जाण्यानेही धास्तावलेत कर्मचारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील कोदणी वीज प्रकल्पामधून काही दिवसापासून वीज निर्मिती बंद आहे. परंतु या ठिकाणी काम मात्र सुरु आहे. अशा ठिकाणी बिबट्याच्या मादीची प्रसूती झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला. 

यामुळे वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली. अशा यापरिस्थितीमध्ये येथील कर्मचारी सध्या कामकाज करत असताना वनविभागाचे अधिकारी सांगत होते की, पंधरा दिवसांत ‘ती’ पिल्लांना घेऊन तेथून निघून जाईल.

दोन-तीन दिवस ती त्या ठिकाणी दिसलीच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, रविवारी दुपारी वीज प्रकल्पाच्या उंच गेटवरून उडी मारताना बिबट्या मादी पुन्हा दिसली आणि सर्वानाच धडकी भरली.

शिवाय ती एकटीच गेली, पिल्ले आतच असल्याने ती पुन्हा येईल, याची भीतीही कायम आहे. या बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला. मात्र ही मादी त्यात अडकली नाही.

पंधरा दिवसांनी ती पिल्लांना तेथून घेऊन जाईल, त्यामुळे गेट उघडेच ठेवा, असा सल्ला वन अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार गेट उघडे ठेवण्यात आले. पंधरा दिवस होऊन गेले. शिवाय मधल्या काळात ती दिसली नाही.

त्यामुळे ती गेली असे समजून पुन्हा गेट बंद करण्यास सुरवात झाली. रविवारी दुपारी गेट बंदच होते.  त्या काळात ही मादी उंच गेटवरून उडी मारून जाताना दिसली. कंट्रोल कॅबिनमधील वसंत आरोटे यांनी सीसीटीव्हीमध्ये हे दृष्य पाहिले.

त्यांनी तातडीने इतर सहकारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. जाताना ती एकटीच गेली. म्हणजे तिची पिल्ले अद्याप आतमध्येच असावीत. त्यांच्यासाठी ती पुन्हा येऊ शकते. त्यामुळे आता पुन्हा एकदा तिला पकडण्यासाठी हाचचाली सुरू झाल्या आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment