विखेंच्या शेतातील ‘त्या’ बिबट्याचा ड्रोनच्या सहाय्याने शोध; पण….

Published on -

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- मागील शनिवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे त्यांच्या लोणीतील शेतावर त्या नातवांसोबत असताना अचानक त्यांच्यासमोर असणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला होता.

व त्या त्यातून सुदैवाने बचावल्या होत्या. या घटनेमुळे सोमवारी वनाधिकार्‍यांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या साह्याने उसाच्या शेतात बिबट्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षांचा चिरंजीव जयवर्धने यांच्यासोबत शालिनी विखे पाटील लोणी येथील शेतात असताना

उसातून बिबट्याने त्यांच्याकडे झेप घेतली. तिघांपासून अवघ्या पाच फुटांवरील कुत्र्याला जबड्यात पकडून तो क्षणात उसात दिसेनासा झाला. या घटनेनंतर विखे घर चांगलेच धास्तावले होते.

त्यानंतर रविवारी वन अधिकार्‍यांनी या शेतात दोन पिंजरे लावले. मात्र बिबट्या काही त्यात अडकला नाही.सोमवारी वन अधिकारी आणि प्राणी मित्र यांनी ड्रोन कॅमेर्‍याची व्यवस्था केली.

ड्रोनच्या साह्याने आजूबाजूच्या सर्व ऊस पिकात बिबट्याचा शोध घेण्यात आला मात्र बिबट्या दिसून आला नाही. दरम्यान, बिबट्याने ओढत नेलेला कुत्राही बचावला आहे.

कारण त्याच्या गळ्यात लोखंडी पट्टा असल्याने बिबट्याला त्याची शिकार करता आली नाही. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर ‘देवाच्या कृपेने कुत्रे मध्ये आले,

अन्यथा…? काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. ग्रामदैवत म्हसोबाच्या कृपेने फार मोठे विघ्न टळले. लोकांची अहोरात्र सेवा विखे घराणे करत आहे.

त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. या आशीर्वादाच्या शक्तीमुळेच आम्ही बचावलो’ अशी प्रतिक्रिया शालिनीताई विखे यांनी दिली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe