बर्थडे पार्टी पडली महागात; ११ जणांना कोरोनाची बाधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- वाढदिवस म्हंटला कि, मित्रमंडळी जल्लोष हा आलाच… मात्र असाच एक वाढदिवस साजरा करणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. अकोले तालुक्यातील एका हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी सुरु होती.

या पार्टीला सुमारे ४० तरुण उपस्थित होते. अन्‌ सकाळी हॉटेलच्या मालकाचा मुलगा व घरातील अजून एका महिलेसह एकाच घरातील ११ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली.

दरम्यान या सर्वाना रुग्णालयात दाखल केले, तर सुमारे ४० व्यक्तींना होम कोरांटाईन केले आहे, अशी माहिती डॉ. संतोष चोळके यांनी दिली. तब्बल ११ जणांना कोरोनाची लागण आल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान हे क्षेत्र आता प्रतिबंधात्मक म्हणून जाहीर करुन सील केले आहे. त्यामुळे वसाहतीत असलेले हॉटेल कोणाच्या आशीर्वादाने सुरु होते? असा सवाल भंडारदराच्या ग्रमस्थांनी केला आहे.

परिसरातील नागरिकांकडून तहसीलदार, पोलिस स्टेशन, तसेच काही अन्य अधिकाऱ्यांना हॉटेल बंद करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला.

परंतु या निवेदनाकडे कोणीही लक्ष दिले नाही.प्रशासन येथे पोहचण्याची आधी कोरोना पोहचला व शेवटी हॉटेल परिसर सील करण्यात आला.

दोषींवर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू

याप्रकरणी जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर व हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

2 दिवसात कार्यवाही झाली तर ठीक, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment