अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- वादळी वार्यासह झालेल्या पावसाने हाती आलेली पिक जमीनदोस्त झाली आहेत.नैसर्गिक संकटाने शेतकरी आर्थिकदृष्टय़ा मोठ्या अडचणीत आले असून,
राज्य सरकारने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आशी मागणी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राहाता तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या स्वरुपातील पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये डाळिंब बागांसह ऊस घास तूर मूग सोयाबीन कापसासह भाजी पाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक ठिकाणी शेतातील उभी पिक जमीनदोस्त झाल्याने
शेतकऱ्यांना माठा अर्थिक फटका सहन करावा लागला आहे. या नूकसानग्रस्त भागाची पाहाणी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल व कृषी अधिकार्या समवेत करून शेतकऱ्याशी संवाद साधाल.काही ठिकाणी घरांची पडझडही मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचीही पाहाणी करून या कुटूबियांना दिलासा
देतानाच शासनाकडून मदत मिळवून देण्याचा दिलासा त्यांनी दिला. आ.विखे पाटील यांनी सकाळपासून भगवतीपूर कोल्हार तिसगाव राजूरी अस्तगाव पिंपळस या गावात शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची तसेच पावसाच्या पाण्याने शेतात उफाळून आलेल्या जमीनीची आणि रस्त्यांच्या झालेल्या
नूकसानीची पाहाणी करून उपाय योजनांबाबत अधिकार्याना त्यांनी सूचना दिल्या. आ.विखे पाटील यांनी भगवतीपूर येथील शेतामध्ये येत असलेल्या ओढ्याच्या पाण्याची पाहाणी करून ओढ्याच्या रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अस्तगाव येथे फुटलेल्या गणेश बंधार्याची पाहाणी करून बंधार्याचे काम सिंमेट काॅक्रीटने करुन देण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. नूकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आ.विखे यांनी महसूल व कृषि विभागाला दिले असल्याचे स्पष्ट करून गावठाणातील शाळेच्या आवारात साठलेल्या पाण्याची पाहाणी केली.
अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्याने पाण्याचे प्रवाह बदलत असून याबाबत गावपातळीवरच निर्णय करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान पाहाणी झाल्यानंतर आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नूकसानीचे स्वरुप भयानक असून. शासनाने तातडीने मदत देण्याची गरज आहे.
यापुर्वी नैसर्गिक संकटात नूकसान झालेल्या पिकांची भरपाई शासनाने दिलेली नाही.कोव्हीड १९ मुळे शेतकरी आधीच अर्थिक संकटात आहेत.आता नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागल्याने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करून दिलासा देण्याची मागणी विखे पाटील यांनी केली.
तहसिलदार कुंदन हिरे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे कृषी अधिकारी शिंदे बांधकाम विभागाचे अभियंता वर्पे यांच्यासह संस्थाचे पदाधिकारी या पाहाणी दौर्यात सहभागी झाले होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved