धक्कादायक! ‘ह्या’ पंचायत समितीत लाखोंची अफरातफर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या महामारीत सर्वजण पिचलेले असताना भ्रष्टाचारासारखे गुन्हे समोर येत आहे. आता असाच एक प्रकार शेवगाव पंचायत समितीमध्ये उघडकीस आला आहे.

सेवानिवृत्ती वेतन पेन्शन विभागात लाखो रुपयांची अफरातफर झाली असून भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालुन प्रकरण दडपविण्यात आले असल्याचा आरोप माहिती अधिकार मंचाचे जिल्हा उपाध्यक्ष तात्यासाहेब रिसे यांनी केला आहे. सदर प्रकरणी चौकशी करून गैरव्यवहार करणाऱ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी रिसे यांनी केली आहे.

अधिक माहिती अशी : नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये निवृत्ती वेतन विभागात संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमताने निव्रुत्तीधारकांचे नावे बनावट चलने केली. त्यातून ६ लाख ४३ हजार १३९ रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाले. या बाबतीत तात्यासाहेब रिसे यांनी विभागीय आयुक्त नासिक यांना पुरावे सादर केले.

त्यानुसार विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने चैकशी व तपासणी करून अहवाल सादर केला. सदर अहवालाचे अवलोकन करता रुपये ६ लाख ४३ हजार १३९ /- एवढ्या अतिप्रदान रकमेस व लेखा विषयक अनियमितते संबंधी बाबीसाठी पंचायत समितीतील लेखा शाखेतील लेखा कर्मचारी सुद्धा जबाबदार असल्याचे

दिसून येत असल्याने संबंधीतावर शिस्तभंगाची उचित कारवाई करणेकामी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८ मधील व महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील ३ मधील तरतुदी नुसार संबंधित कर्मचाऱ्यांन विरुद्ध कारवाई करण्याचे

आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना दिले मात्र दोन महिन्यांचा कालावधी होऊन ही शेवगाव पंचायत समितीच्या लाखो रुपयांची अफरातफर करणाऱ्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अजूनही मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येणार असल्याने जिल्हा परिषदेच्या विशेष चौकशी पथकाने प्रत्यक्ष तपासणी करावी अन्यथा अमरण उपोषण करण्याचा इशारा तात्यासाहेब रिसे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment