मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात सरसकट समावेश करावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राज्यात ठिकठिकाणी याचे तीव्र पडसाद देखील उमटले आहे. याचबाबत आता नगरमध्ये देखील मार्था आरक्षणाची ठिणगी पडली आहे.

न्या. एम. जी. गायकवाड मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मराठा समाज राज्य घटना कलम ३४० मधील आरक्षणास पात्र ठरला आहे.

मराठा समाजाचा सरसकट ओबीसी संवर्गात समावेश करण्यासाठी राज्य शासनाने न्या. एम. जी. गायकवाड आयोगाच्या सर्व शिफारसिंचा स्वीकारून विनाविलंब राज्यात मराठा समाजाचा समावेश ओबीसी

आरक्षण यादीत करून मराठा समाजावर वर्षानुवर्ष होणारा अन्याय दूर करावा. जोवर मराठा समाजास सर्व निकषांवर टिकणारे आरक्षण मिळत नाही तोवर राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रियेस स्थगिती द्यावी,

या मागणीचे निवेदन मराठा सेवा संघ प्रणीत अहमदनगर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे व उत्तर विभागाच्या जिल्हाध्यक्षा संपूर्णा सावंत यांनी निवासी उपजिल्हाधिकारींना दिले आहे.

यावेळी प्रदेश सचिव राजश्री शितोळे, शहराध्यक्षा सुरेखा कडूस, नगरसेविका संध्या पवार, ॲड. अनुराधा येवले, सविता मोरे, मिनक्षी वागस्कर, मंदा वडगणे, मिनक्षी जाधव, माधुरी साळुंके, मंगल शिरसाठ, श्रद्धा पवार, ज्योती काळे, प्रतिभा काळे आदि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment