झाले ‘असे’ काही, अन 5 एकर जमीन गेली पाण्याखाली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- यंदा पावसाने सर्वत्र हजेरी लावली. परंतु अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात हाल जाळे. अनेक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले.

बोधेगाव येथील शेतकऱ्याच्या जमिनीत नालाबांधाचे पाणी शेतात घुसून साठल्याने पाच एकर शेत जमिनीतील कपाशी, बाजरी, तूर, भुईमूग पीक पाण्यात गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रोजगार हमी योजनेतून नालाबांध 1985 च्या सुमारास झाला आहे. मात्र त्याचा मोबदला शासनाने संबंधित शेतकर्‍यांना दिला नाही,

शिव रस्त्यावर बेकायदेशीरपणे हा नालाबांध महसूल प्रशासनाने हाती घेतला आहे. तसेच नालाबंधाचा सांडवा अर्धवट राहिल्याने दरवर्षी पाऊस झाल्यास शेतजमीन पाण्याखाली जात आहे. खरीप पिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महसूल प्रशासनाकडे याबाबत 40 वर्षांपासून वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र आश्वासनांशिवाय काहीच हाती आले नाही.

महसूल प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशीमागणी शेतकऱ्यांमध्ये होत आहे. दरम्यान जिल्हाभरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.

या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक

आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment