गांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने गांधी जयंती दिवशी म्हणजेच शुक्रवारी-02 ऑक्टोबरला गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान या आंदोलनाच्या दिवशी एसटी बसच्या डाव्या साईडच्या काचेवर ‘जुलमी परिपत्रके काढून अन्याय केला जात आहे. ३ महिन्यापासून पगार मिळालेला नाही, तरीपण आम्ही सेवा देत आहोत.

‘, अशा आशयाचे स्टीकर लावून गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी बचाव-कामगार बचाव अभियानांतर्गत राज्यातील सर्व आमदार व खासदार यांना निवेदन देऊन एसटी महामंडळास आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी

कायमस्वरूपी उपाययोजना करून एसटी कर्मचा-यांचे पगार द्यावेत अशी विनंती केली, परंतु एसटी कर्मचा-यांचे माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन रखडले याशिवाय दररोज नवीन परिपत्रक काढून कामगारांवर अन्याय केला

जात असून कामगारांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच भविष्यात कोणतेही आंदोलन अथवा संप करण्याची वेळ आल्यास प्रवाशांना याबाबत माहिती असावी व वास्तव कळावे

यासाठी नावीन्यपूर्ण गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी कर्मचा-यांना थकीत वेतन न मिळाल्यास होणा-या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी एसटी महामंडळाची असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

 

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment