शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबविणार्‍या केंद्र सरकारच्या निषेधार्थ दोन तास मौनव्रत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-समाजवादी पार्टीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तर शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांच्या विरोधी धोरण राबविणार्‍या केंद्र सरकारच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी दोन तास मौनव्रत धारण केले होते.

कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. तर सर्वसामान्य नागरिक दारिद्रयाच्या खाईत लोटला जात असल्याचे समाजवादी पार्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

यावेळी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजीम राजे, नदिम शेख, दिशान शेख, मोहंमद हुसेन, फईम शेख, महेश उमाप, शाहरुख शेख, ओमकार केंद्रे, उमेर शेख, मुबारक शेख आदि उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment