अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकारण आणि राजकीय पक्षातील गटबाजीचे किस्से चांगलेच रंगू लागले आहे. नुकतीच महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
याच अनुषंगाने शहरात देखील बापूंची जयंती उत्साहात साजरी झाली. मात्र काँग्रेसच्या वतीने शहरात दोन वेगवगेळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने काँग्रेसच्या गटबाजीच्या चर्चा नगरकरांमध्ये रंगू लागल्या होत्या.
याच पार्शवभूमीवर आज काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यानॆ या प्रकरणाचा खुलासा केला आहे. म.गांधी जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन काल २ ऑक्टॉबर रोजी म. गांधी जयंती दिनी करण्यात आली.
मात्र काही वृत्तपत्रांनी त्यास गटबाजीचे स्वरूप देऊन बातम्या प्रसिद्ध केल्या. मात्र कालचे धरणे आंदोलने हे गटबाजीतून नव्हे तर पक्षाच्या आदेशानुसारच करण्यात आल्याची माहिती शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली.
म.गांधी जयंती दिनी दोन ठिकाणी धरणे आंदोलने झाल्याने त्याला गटबाजीचे स्वरूप देणे योग्य नव्हे, उलटपक्षी पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष, शहर ब्लॉक कमिटी अध्यक्ष, युवक काँग्रेस आणि पक्षाच्या अन्य शाखांनाही कार्यक्रम करण्याविषयीचे पत्रक पाठविले होते.
त्यानुसारच आम्ही वाडियापार्क येथील महात्मा गांधी पुतळ्या जवळ तर किरण काळे यांनी मार्केट कमिटी येथे धरणे आंदोलन केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved