Mahindra Electric Car Launch : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे देशातील एक प्रमुख कार उत्पादक कंपनी लवकरच भारतीय बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. खरे तर भारतीय कार बाजार इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सध्या टाटा कंपनीचा बोलबाला आहे.
या कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये मोठा वाटा आहे. आता मात्र टाटा कंपनीची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी महिंद्रा कंपनी देखील पुढे सरसावली आहे. कार उत्पादक कंपनी महिंद्रा XUV700 च्या इलेक्ट्रिक आवृत्तीवर काम करत असल्याची बातमी समोर आली आहे.

ही एसयुव्ही XUV.e8 या नावाने विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे मीडिया रिपोर्ट मध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार असा दावा केला जात आहे. या गाडीचे डिझाइन पेटंट करण्यात आले आहे.
ही गाडी या वर्षाच्या शेवटी लॉन्च होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान ही गाडी भारतीय बाजारात लॉन्च होण्यापूर्वी याचे अनेक नवीन तपशील उघड झाले आहेत. अलीकडे, या गाडीचे नवीन 3-स्क्रीन सेटअपचे तपशील उघड झाले आहेत, जे की या सेगमेंटमधील पहिलेचं राहणार आहे.
दरम्यान आता आपण या कारची सविस्तर माहिती पाहणार आहोत. या गाडीचे डिझाईन पेटंट इमेज समोर आली आहे. या डिझाइन पेटंट इमेजवरून असे दिसते की 3-स्क्रीन लेआउटमध्ये स्क्रीनच्या मध्यभागी बेझल आहेत. बेझल्स खूप रुंद आहेत आणि ते राखाडी रंगाचे फिनिश केलेले दिसत आहेत.
पण उत्पादन मॉडेलमध्ये ते अधिक गडद आणि चमकदार रंगाचे राहू शकतात. मोठ्या 3-स्क्रीन सेटअपला पुरेसे संरक्षण देण्यासाठी हेवी बेझल निवडले जाऊ शकतात. हाती आलेल्या माहितीनुसार ऑटोमेकर महिंद्राने XUV.e8 साठी नवीन हेडलॅम्प डिझाइन आणि नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलचे पेटंट देखील घेतले आहे.
ही नवीन वैशिष्ट्ये ICE मॉडेलपेक्षा वेगळी आहेत. हे नवीन पेटंट फीचर्स XUV.e9 वर देखील उपलब्ध असण्याची शक्यता आहे. XUV.e9 हा XUV.e8 चा कूप प्रकार राहणार आहे. महिंद्रा कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक SUV गाड्या INGLO या प्लॅटफॉर्मवर आधारित राहणार आहेत.
कंपनीच्या या आगामी XUV.e8 कार मध्ये 80 Kwh चे बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. या गाडीत ऑल व्हील ड्राईव्ह उपलब्ध राहू शकते अशी देखील माहिती समोर येत आहे. XUV.e8 ही गाडी टाटा कंपनीची हॅरीयर या गाडीसोबत स्पर्धा करणार आहे.
टाटा कंपनीची ही अपकमिंग इलेक्ट्रिक कार 2025 मध्ये लॉन्च होणार आहे. तसेच महिंद्रा कंपनीची ही आगामी कार या वर्षाच्या अखेरीस भारतीय कार बाजारात येऊ शकते असा एक अंदाज आहे.