Ahmednagar News : वेश्या व्यवसाय छाप्यातील ‘पिटा’ नुसार कारवाई केलेली महिला सिव्हील हॉस्पिटलमधून पसार, नेमके काय घडले? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून तुरुंगातून कैदी पसार होण्याच्या घटना यादी अनेकदा घडलेल्या आहेत. आता वेश्या व्यवसाय छाप्यातील ‘पिटा’ नुसार कारवाई केलेली महिला सिव्हील हॉस्पिटलमधून पसार झाल्याची घटना घडली आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरातील एका हॉटेलवर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकलेला होता. यामध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले होते. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या पश्चिम बंगालमधील महिलेची पोलिसांनी सुटका केली.

या महिलेचे स्नेहालयात पुनर्वसन केले जाणार होते. मात्र, त्याआधीच जिल्हा रुग्णालयात तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना, बेलवंडी पोलिसांच्या ताब्यातून ही महिला पसार झाली. या घटनेमुळे सध्या विविध चर्चाना तोंड फुटले आहे. ही महिला पसार होतेच कशी यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कुंटणखाना चालवणाऱ्या छाया शशिकांत चव्हाण (रा. शिरूर) व हॉटेलमालक पप्पू राक्षे (रा. गव्हाणवाडी) यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार, पुणे येथे महिलांसाठी काम करणाऱ्या लायसन ऑफिसर संस्था फ्रीडम फॉर्मच्या प्रतिनिधींसह पोलिसांनी गव्हाणवाडीतील हॉटेलवर छापा घातला. तेथून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या महिलेची सुटका केली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित महिलेची वैद्यकिय तपासणी करण्यासाठी एका महिला पोलिसाची नेमणूक केली होती. मात्र, जिल्हा रुग्णालयात तपासणीदरम्यान ती पळून गेली असल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली.

तर ‘पिटा’ अंतर्गत कारवाई केलेल्या महिलेला पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. मात्र, ती कधी पळून गेली, हे माहितच झाले नाही. यात माझी काहीही चूक नसल्याचे संबंधित पोलीस सांगते असे एका मीडियाने वृत्त दिले आहे. दरम्यान या घटनेचा तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe